खान्देशगुन्हेजळगांव

जळगावात ऑनलाइन चक्री जुगार अड्ड्यावर छापा; तिघांना मुद्देमालासहअटक

जळगाव :- शहरात काही भागात ऑनलाईन चक्री जुगार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यातून लाखोंची उलाढाल होते. पोलीस ठाण्यांतर्गत शहरातील सिंधी कॉलनी परिसरात भाजीपाला मार्केट येथे सुरू असलेल्या चक्री सेंटर मध्ये डीवायएसपी संदीप गावित यांच्या पथकाने आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास धाड टाकून हा चक्री जुगार अड्डा चालविणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ४९ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांना ऑनलाईन चक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी, पोकॉ गोपाळ पाटील, पोकॉ सचिन साळुंखे यांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता कॅसिनो स्टाईल जुगार चालत असल्याचे दिसून आले.
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पो.उप.निरी. दत्तात्रय पोटे, सचिन पाटील, योगेश बारी यांच्यासह पथकाने दुपारी ३.३० वाजता धाड टाकून तीन जणांना ताब्यात घेतले. यात संतोष नानकराम रामचंदाणी (वय ३२ वर्ष, रा. कंवर नगर, सिंधी कॉलनी, जळगाव), वसीम शहा शब्बीर शहा (वय ३२ वर्ष, रा. बिलाल चौक, , तांबापुरा), निलेश दिनेश सरपटे (वय ३३ वर्ष,रा. बिलाल चौक, तांबापुरा), निलेश दिनेश सरपटे (वय ३३ वर्ष, रा. नवल कॉलनी, सिंधी कॉलनी) असे तिघा संशयितांचे नाव आहे. त्यांच्याकडून ४९ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोकॉ सचिन साळुंखे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button