जळगाव : कट रचून ३० ते ४० जणांच्या टोळक्याने वसीम खान हिदायत खान पठाण (वय ४१, रा. ममुराबाद) या वकिलाला बेदम मारहाण करीत एकाने धारदार वस्तूने वार केला. यामध्ये वकील गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी दि. १६ जानेवारी रोजी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे वसीमखान पठाण हे वास्ताव्यास होते. ते घरी असताना काही जणांनी घरात प्रवेश करून त्यांना मारहाण केली. एकाने धारदार शस्त्राने पोटावर वार केला, मात्र तो पठाण यांनी चुकविला व यात त्याचे शर्ट फाटले. काही जणांनी त्यांना खाली पाडून मारहाण केली. या सर्वांच्या तावडीतून सुटका करून ते बाहेर जात असताना त्यांना ३० ते ४० जणांनी घेराव घातला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे