गुन्हे

अरे बापरे.. पोलीस निरीक्षकाचा प्रताप, दोन पत्नी असताना तिसरीशी संसार

खान्देश टाइम्स न्यूज | ७ जुलै २०२३ | फसवणुकीच्या प्रकरणात अबला नारीला मदत करणारेच फसवणूक करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. एका पोलीस निरीक्षकाने पहिल्या पत्नीला फारकत देणार असल्याचे सांगत दुसऱ्या महिलेशी लग्न केले. अगोदरच दोन बायका असताना पुन्हा तिसरीशी घरोबा करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोंडाईचा येथील रहिवासी असलेल्या एका पोलीस निरीक्षकाने पहिल्या पत्नीला फारकत देणार असल्याचे सांगत तळोदा येथील २८ वर्षीय महिलेशी मार्च २०१९ मध्ये लग्न केले. त्यांना एक मुलगीही झाली. पोलीस निरीक्षकाने त्या महिलेला तळोदा (नंदुरबार) येथे रूम करून दिला.

दुसरी पत्नी घरी असताना तिसऱ्या महिलेशी लग्न करून तळोद्यातील पत्नीला शिवीगाळ करून पोलीस निरीक्षकाने हाकलून लावत फसवणूक केली. अखेर पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिस निरीक्षक नितीन सुखदेव चव्हाण (रा.राऊळनगर, दोंडाईचा) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button