खान्देशजळगांवराजकीय

महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या जळगाव जिल्हाप्रमुखपदी नंदू आप्पा पाटील

महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या जळगाव जिल्हाप्रमुखपदी नंदू आप्पा पाटील
जळगाव : प्रतिनिधी — शिवसेना पक्षाच्या महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेत जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण राजकीय निर्णय घेत नंदू आप्पा पाटील यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे जिल्ह्यात शिवसेनेला नवे बळ आणि ऊर्जा मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते मा. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे प्रदेशाध्यक्ष मा. शिवाजी भोर यांच्या हस्ते नंदू आप्पा पाटील यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

नंदू आप्पा पाटील हे जळगाव जिल्ह्यातील सक्रिय व लोकप्रिय समाजसेवक म्हणून ओळखले जातात. वाहतूक क्षेत्र, कामगार संघटना तसेच शिवसेना पक्षाच्या माध्यमातून त्यांनी जनतेच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला आहे. त्यांच्या संघटन कौशल्य आणि नेतृत्वगुणांच्या जोरावरच त्यांची या पदासाठी निवड झाल्याचे मानले जात आहे.
विशेष म्हणजे, ते कुस्ती क्षेत्रातील मान्यवर आणि कुस्ती समितीचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील यांचे बंधू असून सामाजिक, क्रीडा व राजकीय क्षेत्रात त्यांच्या कुटुंबाचा प्रभाव आहे.

या नियुक्तीनंतर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, वाहतूक क्षेत्रातील प्रश्न सोडवणे आणि संघटना अधिक मजबूत करणे यासाठी नंदू आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

“संघटन बळकट करून वाहतूक क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे हेच आमचे प्रमुख ध्येय असेल,” असा निर्धार नंदू आप्पा पाटील यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button