खान्देश

जळगाव, क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’चा बिगुल

भव्य रॅलीतून शहरात क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला
जळगाव (प्रतिनिधी) — जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ (JCL T-20) स्पर्धेचा बिगुल भव्य आणि जल्लोषमय रॅलीतून वाजविण्यात आला. सहा संघांचे मालक, प्रशिक्षक आणि खेळाडूंनी सहभाग घेत शहरातून काढलेल्या या रॅलीने क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाची लाट निर्माण केली.
रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्या प्रमुख प्रायोजकत्वाखाली व अलरीक इलेक्ट्रीकल्सच्या सहप्रायोजकत्वाखाली ही स्पर्धा १८ ते २६ एप्रिल दरम्यान कांताई नगर, जैन ड्रीम स्पेसेस, मेहरूण तलाव परिसरात रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर काव्यरत्नावली चौक येथून रॅलीची सुरुवात करण्यात आली.
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष एस. टी. खैरनार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. यावेळी दाल परिवारचे अतुल कोगटा, एस. के. ट्रान्सलाईनचे प्रणव कोठारी, सातपुडा ऑटोमोबाईलचे किरण बच्छाव, सुहांस केमिकल्सचे संदीप काबरा, सीए महावीर जैन, विमल जैन, खलिल बनावट, सागर पार्क क्लबचे सहकारी, अनिल कांकरिया, सचिव अरविंद देशपांडे, खजिनदार राजेंद्र लढ्ढा, अॅड. सुरज जहांगिर आदी उपस्थित होते.
मोटारसायकल रॅली काव्यरत्नावली चौकातून निघून कलेक्टर बंगला मार्ग, मू. जे. महाविद्यालय, प्रभात चौक, स्वातंत्र्य चौक, पांडे डेअरी चौक, बेंडाळे चौक, चित्रा चौक मार्गे पुन्हा प्रारंभस्थळी परतली. या ठिकाणी संघमालक व मान्यवरांच्या हस्ते सहा संघांच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले.
जळगाव कोगटा किंग, पाचोरा एसकेटी योद्धाज, जामनेर सातपुडा हिरोज, चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स, अमळनेर सुहांस जायंट्स आणि रावेर रॉयल्स या संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेमुळे शहरात क्रीडारसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“आता मौका… जळगाव क्रिकेट लीगचा… खेळाची ताकद दाखविण्याचा आणि जळगावची शान उंचाविण्याचा,” अशा घोषणांनी रॅली दुमदुमली. संघांचे ध्वज आणि जर्सी परिधान करून सहभागी झालेल्या खेळाडूंनी शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले.
या भव्य रॅलीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्यांसह विविध कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.दि. १६ (प्रतिनिधी) — जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ (JCL T-20) स्पर्धेचा बिगुल भव्य आणि जल्लोषमय रॅलीतून वाजविण्यात आला. सहा संघांचे मालक, प्रशिक्षक आणि खेळाडूंनी सहभाग घेत शहरातून काढलेल्या या रॅलीने क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाची लाट निर्माण केली.

रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्या प्रमुख प्रायोजकत्वाखाली व अलरीक इलेक्ट्रीकल्सच्या सहप्रायोजकत्वाखाली ही स्पर्धा १८ ते २६ एप्रिल दरम्यान कांताई नगर, जैन ड्रीम स्पेसेस, मेहरूण तलाव परिसरात रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर काव्यरत्नावली चौक येथून रॅलीची सुरुवात करण्यात आली.
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष एस. टी. खैरनार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. यावेळी दाल परिवारचे अतुल कोगटा, एस. के. ट्रान्सलाईनचे प्रणव कोठारी, सातपुडा ऑटोमोबाईलचे किरण बच्छाव, सुहांस केमिकल्सचे संदीप काबरा, सीए महावीर जैन, विमल जैन, खलिल बनावट, सागर पार्क क्लबचे सहकारी, अनिल कांकरिया, सचिव अरविंद देशपांडे, खजिनदार राजेंद्र लढ्ढा, अॅड. सुरज जहांगिर आदी उपस्थित होते.

मोटारसायकल रॅली काव्यरत्नावली चौकातून निघून कलेक्टर बंगला मार्ग, मू. जे. महाविद्यालय, प्रभात चौक, स्वातंत्र्य चौक, पांडे डेअरी चौक, बेंडाळे चौक, चित्रा चौक मार्गे पुन्हा प्रारंभस्थळी परतली. या ठिकाणी संघमालक व मान्यवरांच्या हस्ते सहा संघांच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले.

जळगाव कोगटा किंग, पाचोरा एसकेटी योद्धाज, जामनेर सातपुडा हिरोज, चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स, अमळनेर सुहांस जायंट्स आणि रावेर रॉयल्स या संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेमुळे शहरात क्रीडारसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

“आता मौका… जळगाव क्रिकेट लीगचा… खेळाची ताकद दाखविण्याचा आणि जळगावची शान उंचाविण्याचा,” अशा घोषणांनी रॅली दुमदुमली. संघांचे ध्वज आणि जर्सी परिधान करून सहभागी झालेल्या खेळाडूंनी शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले.
या भव्य रॅलीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्यांसह विविध कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button