आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वृक्षारोपण

आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वृक्षारोपण
जळगाव: आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) परिसरात मोठ्या उत्साहात वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. वाढदिवसाचा खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत हा पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला.
याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता डॉ. उमेश लाड, अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण, तसेच ‘गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षा’चे आरोग्यदूत पै.शिवाजी पाटील, महेश चौधरी आणि रवी बागुल प्रामुख्याने उपस्थित होते.
रुग्णालय परिसरात विविध प्रकारच्या सावली देणाऱ्या आणि औषधी वनस्पतींच्या रोपांची लागवड करण्यात आली. केवळ वृक्षारोपण न करता या झाडांचे नियमित संवर्धन करण्याचा संकल्पही या वेळी करण्यात आला. या पर्यावरणपूरक उपक्रमात राकेश चौधरी, भैय्या पाटील, मुरलीधर अण्णा, तुकाराम कोल्हे अभिषेक बाविस्कर हेमंत पाटील यांच्यासह महाविद्यालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.





