खान्देशजळगांवशिक्षणसामाजिक

अफरोज खाटीक यांची (ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत परिक्षणार्थी विद्यार्थिनी म्हणून निवड

अफरोज खाटीक यांची (ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत परिक्षणार्थी विद्यार्थिनी म्हणून निवड

पाचोरा /चाळीसगाव प्रतिनिधी: तालुक्यातील लोहारा येथील मूळ रहिवाशी व सध्या चाळीसगाव येथे स्थित अफरोज मोहम्मद रफीक हाजी बिस्मिल्लाह खाटीक हिची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्या केरळ येथे आयोजित विशेष वैज्ञानिक प्रशिक्षण व परीक्षण कार्यक्रमासाठी परिक्षणार्थी विद्यार्थिनी म्हणून निवड झाली आहे.

या निवडीमुळे लोहारा व चाळीसगाव शहरासह खाटीक समाज आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्याची मान उंचावली असून
अफरोज खाटीक यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.अत्यंत जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर अफरोजने हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशामागे तिचे कुटुंब, शिक्षक आणि मार्गदर्शक यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button