खान्देशगुन्हेजळगांव

सराईत गुन्हेगार ‘भोमपाली’ एलसीबीच्या जाळ्यात; गावठी पिस्तूल जप्त

५८ गंभीर गुन्ह्यांतील आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

सराईत गुन्हेगार ‘भोमपाली’ एलसीबीच्या जाळ्यात; गावठी पिस्तूल जप्त

५८ गंभीर गुन्ह्यांतील आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक कारवाई करत सराईत गुन्हेगार विजय वसंत अहिरे उर्फ ‘भोमपाली’ याला अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीचे बेकायदेशीर गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, गेंदालाल मिल परिसरात विजय अहिरे हा गावठी पिस्तूल बाळगून फिरत असून परिसरात दहशत निर्माण करत आहे. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी २ जुलै रोजी सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय वसंत अहिरे उर्फ भोमपाली (वय ३२) हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध जळगाव शहर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यांत खुनाचा प्रयत्न, दरोड्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, मारहाण, दंगल तसेच शस्त्र कायद्याअंतर्गत एकूण ५८ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, अक्रम शेख, विजय पाटील, किशोर पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव तसेच पोलिस कॉन्स्टेबल छगन तायडे, रविंद्र कापडे, राहुल रगडे, प्रदीप सपकाळे आदींच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button