
जळगाव शहर जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मान्यता; लवकरच दुसरी पुरवणी यादी जाहीर होणार
जळगाव : काँग्रेसच्या **संघटन सृजन अभियानांतर्गत जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मान्यता दिली आहे. जळगाव शहर जिल्हाध्यक्ष जमील शेख यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत. तसेच लवकरच प्रदेशाध्यक्षांच्या मान्यतेनंतर कार्यकारिणीची दुसरी पुरवणी यादी प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात आले.
जळगाव शहर जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी चंद्रकांत उदयसिंह पाटील, विष्णू गणपत घोडेस्वार, अहमद खान रोशन खान पठाण, सुभाष जाधव आणि पराग पांडुरंग बाविस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राजेश गजानन मंडोरा यांची जिल्हा काँग्रेसच्या खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.सरचिटणीसपदी देविदास चावदस ठाकरे, उद्धव रमेश वाणी, वसीम अख्तर अली काझी, युवराज प्रल्हाद खडके, मनोज नारायण वाणी आणि सागर मोतीलाल सपके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सचिवपदी संजू जमादार, सखाराम बुधो मोरे, मिराताई रामेश्वर सोनवणे, अनिता आनंदा कोळी आणि अलका अशोक काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून जळगाव शहरात काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. आगामी काळात पक्षाची ध्येयधोरणे आणि विचारसरणी तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर महत्त्वाची जबाबदारी राहणार आहे





