मुक्ताईनगर :- शेताजवळून पायी जाणाऱ्या विवाहितेचा हात पकडुन तिला जबरदस्तीने केळीच्या शेतात नेऊन विवस्त्र करून तिच्यावर एकाने बलात्कार करून नग्न अवस्थेतील फोटो काढून लोकांना दाखविण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना मुक्ताईनर तालुक्यात घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला एकाविरुध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,मुक्ताई नगर तालुक्यात एका गावात राहणाऱ्या विवाहिता ही दि ०३/ १० / २०२३ रोजी दुपारी ०४.३० वाजताचे सुमारास शेताजवळुन जात असतांना आरोपी बाळकृष्ण दयाराम वाघ हा आला व त्याने तीचा हात पकडुन तीला केळीच्या बागेत ओडत नेवुन विवाहितेचे अंगावरील कपडे | काढुन तीचेशी जबरीने शारीरीक संबध करुन तीचे नग्न अवस्थेतील फोटो लोकांना दाखवेन असा दम दिला. याबाबत पीडित महिलेने मुक्ताईनगर पोलीस स्टेशन गाठून आरोपी बाळकृष्ण दयाराम वाघ याच्याविरुद्ध फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स. पो. नि संदीप दुनगहु करीत आहे.