जळगावः भाजपाचे जळगाव येथे आज दि.५ रोजी सागरपार्कवर युवा संमेलन होत असुन या साठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत आहेत. त्यांची येथे सभा होणार आहे . या सभेसाठी ८०० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱयांच्या चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या दौऱ्यासाठी भाजपाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या तयारीची मंत्री गिरीष महाजन यांनी सोमवारी पाहणी केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचा दौरा निश्चित झाला असून ते आज मंगळवार दि.५ मार्च रोजी दुपारी ३.०५ वाजता बीएसएफच्या हेलिकॉप्टरने जळगाव हेलिपॅड येथे येतील. दुपारी दुपारी ३.२० वा. सागर पार्कसंमेलन कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहे. केंद्रीय आणि स्थानिक पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. विमानतळ ते सागरपार्क या आठ किलो मीटरवर ८०० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.
भाजपातर्फे बाईक रॅली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज जळगाव येथे येणार असुन ‘युवा संवाद’ मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहे. या निमित्त भाजपाचे नेते ना. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात दि.४ रोजी भाजपा कार्यालय पासून ते सागर पार्क बॅरिस्टर निकम चौक जळगाव येथे बाईक रॅली काढण्यात आली.
जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, केतकी पाटील, माजी खासदार उल्हास पाटील, माजी महापौर सीमा भोळे, माजी स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, जिल्हा सरचिटणीस, अरविंद देशमुख, महेश जोशी, नगरसेविका सुचिता हाडा, दीपमाला काळे, गायत्री राणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश पाटील, सरचिटणीस मयूर कापसे, जितेंद्र चौथे, सागर जाधव, गजानन वंजारी व पदाधिकारी तसेच मंडळ अध्यक्ष आघाडी अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.