यावल ;- भोंगऱ्या उत्सव बाजारात एका परप्रांतीय महिलेचा विनयभंगची घटना यावल तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या गाडऱ्या वस्तीवरघडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील गाडऱ्या येथील सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या आदिवासी पाडा वस्तीवर पारंपारिक पद्धतीने भोगऱ्या उत्सव साजरा करण्यात येतो. २४ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास गाडऱ्या गावात एक ४० वर्षीय विवाहित महिला ही आपल्या पती व कुटुंबा सोबत भोंगऱ्या उत्सवा निमित्ताने आल्या होत्या. असता आपश्या भायसिंग सस्ते ( बारेला ) रा. कुंभी ता.भगवानपुरा जि.खरगोन ( मध्य प्रदेश ) याने फिर्यादी महिला ही आपल्या पती सोबत असतांना काही एक कारण नसतांना संशयित आरोपी आपश्या सस्ते याने महिलेचा डावा हात पकडून चापटाबुक्यांनी मारहाण करीत ओढताण करून मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला.
याबाबत यावल पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी आपश्या सस्ते याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन , पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहॅकॉ सिकंदर तडवी करीत आहे .