रावेर यावलच्या विकासाचे ध्येय ठेवत धनंजय चौधरी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार
खान्देश टाइम्स न्यूज l रावेर l २८ ऑक्टोबर २०२४ l रावेर यावलच्या औद्योगिक विकासासाठी, माता भगिनांच्या रक्षणासाठी व परिसराच्या सर्वांगिण विकासाचे ब्रीद घेऊन धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे, महाविकास आघाडी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांनी सांगितले.
मंगळवार दि. २९ ऑक्टोबर सकाळी ९.३० वाजता आठवडे बाजार रावेर येथून तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून हा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. यावेळी महाविकास आघाडीतील माजी मंत्री एकनाथराव खडसे, श्रीराम पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, ज्येष्ठ नेते ॲड. रविंद्रभैय्या पाटील, प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील, माजी आमदार अरुणदादा पाटील, राजाराम गणू महाजन, रमेशदादा चौधरी, संदीपभैय्या पाटील, राष्ट्रवादीचे एजाज मलिक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
रावेर यावल परिसराचा विकास करण्यासाठी सदोदित प्रयत्न करणाऱ्या पूर्वजांच्या पाऊलवाटेवर अजून पुढचे पाऊल टाकत सकारात्मक व शाश्वत विकासाची परंपरा अधिक समृध्द करण्यासाठी माझी उमेदवारी असल्याचे प्रतिपादन यावेळेस धनंजय शिरीष चौधरी यांनी केले. याप्रसंगी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.