इतर

शौर्यवीर ढोल-ताशा पथकाचा वाद्यपूजन सोहळा उत्साहात  

शौर्यवीर ढोल-ताशा पथकाचा वाद्यपूजन सोहळा उत्साहात  

जळगाव l प्रतिनिधी शौर्यवीर प्रतिष्ठान संचलित ढोल-ताशा पथकाचा पाचवा वाद्यपूजन सोहळा रविवार, १ जून २०२५ रोजी नूतन मराठा महाविद्यालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पारंपरिक वाद्यांची शिस्तबद्ध व प्रेरणादायी सादरीकरणाने सोहळ्याला विशेष आकर्षण प्राप्त झाले.

कार्यक्रमाला आमदार सुरेश भोळे, जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे अनिल जोशी, नायब तहसीलदार रूपाली काळे, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि युवासेना विभागीय सचिव विराज कावडिया, तसेच सामाजिक कार्यकर्ते दिलीप नाझरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी पथकाच्या शिस्तीचे व कार्याचे कौतुक करत पथकाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

१६० वादकांचे सशक्त पथक
शौर्यवीर ढोल-ताशा पथकात सध्या १०५ मुले आणि ५५ मुली अशा एकूण १६० वादकांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांपासून हे पथक दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शिवजयंती यांसारख्या उत्सवांत नियमितपणे सादरीकरण करून लोकांच्या मनात आपली खास छाप पाडत आहे.

मराठी परंपरेचे जतन आणि प्रेरणा
मराठी अस्मिता आणि पारंपरिक वाद्यांची महत्त्वाची संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा पथकाचा प्रमुख उद्देश आहे. या माध्यमातून तरुणाईमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त आणि सांस्कृतिक जागर निर्माण होत आहे.

पथकात सहभागी होण्यासाठी संपर्क:
शौर्यवीर ढोल-ताशा पथकात सहभागी होण्यासाठी चिन्मय नाझरकर – ९०२८३२०४७२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button