गुन्हेदेश-विदेश

देवेन भारती मुंबई चे नवे पोलीस आयुक्त ; विवेक फणसाळकर सेवानिवृत्त

देवेन भारती मुंबई चे नवे पोलीस आयुक्त ; विवेक फणसाळकर सेवानिवृत्त

मुंबई | प्रतिनिधी मुंबई पोलीस दलाच्या नेतृत्वात महत्त्वपूर्ण बदल घडला असून, निवृत्त पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यानंतर १९९४ बॅचचे IPS अधिकारी देवेन भारती यांची नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. सध्या विशेष पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) म्हणून कार्यरत असलेले भारती हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अधिकारी मानले जातात.फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर आयुक्तपदासाठी सदानंद दाते, संजयकुमार वर्मा, रितेश कुमार आणि अर्चना त्यागी यांची नावे चर्चेत होती. मात्र, गुन्हेगारीविरोधी मोहिमांमध्ये ठसा उमटवणारे आणि अनुभवी असलेले भारती यांची निवड झाली आहे. त्यांनी मुंबई पोलिसांत गुन्हे शाखेचे अपर आयुक्त, उपायुक्त, सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) आणि महाराष्ट्र ATS प्रमुख अशा महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पोलीस वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button