खान्देशगुन्हेजळगांव

अमळनेरच्या सराफ गल्लीत  घरफोडी; ७० हजारांची रोकड लंपास

अमळनेरच्या सराफ गल्लीत  घरफोडी; ७० हजारांची रोकड लंपास

अमळनेर | प्रतिनिधी
शहरातील सराफ बाजारात  घरफोडीची धक्कादायक घटना गुरुवारी (२२ मे) उघडकीस आली आहे. बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ७० हजार रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेहान सादिक बागवान (वय १९) रा. सराफ गल्ली, अमळनेर परिवारासह राहतात , २१ ते २२ मे दरम्यान त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी  घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि रोख ७० हजार रुपये चोरून नेले.

चोरी झाल्याचे लक्षात येतात रेहान बागवान यांनी तात्काळ अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button