जळगाव समाज कल्याण कार्यालयाला राज्यात प्रथम क्रमांक; सामाजिक न्याय मंत्र्यांकडून सन्मान

जळगाव समाज कल्याण कार्यालयाला राज्यात प्रथम क्रमांक; सामाजिक न्याय मंत्र्यांकडून सन्मान
जळगाव प्रतिनिधी l राज्य शासनाच्या “१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम” अंतर्गत जळगावच्या समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ३१ मे २०२५ रोजी पुणे येथील यशदा येथे आयोजित अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते सहायक आयुक्त योगेश पाटील यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.उपस्थित मान्यवर
या समारंभाला प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे (भा.प्र.से.), आयुक्त ओमप्रकाश बकोरिया (भा.प्र.से.) आणि बार्टीचे महासंचालक सुनील वारे उपस्थित होते.मोहिमेचा उद्देश
“१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम” ही शासकीय कार्यालयांमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि नागरिकाभिमुख सेवा वाढवण्यासाठी राबवण्यात आली. यात कार्यक्षम कारभार, वेळेत काम पूर्ण करणे, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि पारदर्शकता यासारख्या निकषांवर कार्यालयांचे मूल्यमापन झाले.जळगाव कार्यालयाचे यश
जळगावच्या समाज कल्याण कार्यालयाने नवकल्पना, डिजिटल प्रक्रियेचा प्रभावी वापर, योजनांची त्वरित अंमलबजावणी आणि नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करून राज्यात अव्वल स्थान मिळवले.अभिनंदन आणि प्रेरणा
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयाचे कौतुक केले. सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी हे यश संपूर्ण टीमच्या समर्पण आणि सेवाभावाचे फलित असल्याचे सांगितले. मंत्री शिरसाठ यांनी जळगावच्या या यशस्वी कामगिरीला इतर कार्यालयांसाठी प्रेरणादायी ठरवत शासकीय यंत्रणेत सकारात्मक बदलांचा विश्वास व्यक्त केला.