खान्देशजळगांव

कर्तव्यदक्ष ट्रॅफिक पोलिस महिलांचा गौरव

कर्तव्यदक्ष ट्रॅफिक पोलिस महिलांचा गौरव

महिला दिनानिमित्त महाराष्ट्र सुवर्णकार सेना व महिला मंडळाच्या वतीने सन्मान

जळगाव | प्रतिनिधी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील कर्तव्यदक्ष ट्रॅफिक पोलिस महिला अधिकाऱ्यांचा गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र सुवर्णकार सेना, जळगाव जिल्हा, अहिर सुवर्णकार महिला मंडळ तसेच ऋणानुबंध वधू-वर पालक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात महिला पोलिसांच्या कर्तव्यपरायण सेवेला सलाम करत त्यांना सुगंधी पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका रंजना वानखेडे तसेच पोलीस निरीक्षक पवन देसले उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ट्रॅफिक विभागातील महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील वाहतूक व्यवस्थेत शिस्त राखण्यासाठी महिला पोलिस अधिकारी मोनाली कळसकर, सविता परदेशी, शैला धनगर, नंदा सुरवाडे, वैशाली पाटील आणि रंजना बट्टीसे या सातत्याने सेवा बजावत असून त्यांच्या कार्याचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात अहिर सुवर्णकार महिला मंडळाच्या उपाध्यक्ष संगीता विसपुते, कविता पगार, कांचन विसपुते तसेच महाराष्ट्र सुवर्णकार सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विसपुते, उपाध्यक्ष विजय वानखेडे, सचिव संजय पगार आणि समिती प्रमुख बापू रणधीर यांच्या हस्तेही महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रत्नाकर दुसाने, दीपक जगदाळे, सुरेश सोनार, बबलू बाविस्कर, मनोज सोनार, पंकज रणधीर, जितेंद्र देवरे, महेश विसपुते आणि रवींद्र रणधीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button