पोलिस स्पोर्ट्स व आर जे स्पोर्ट्स अकादमीची वार्षिक बेल्ट परीक्षा उत्साहात संपन्न; गुणवंत खेळाडूंना प्रशस्तीपत्रांचे वाटप

पोलिस स्पोर्ट्स व आर जे स्पोर्ट्स अकादमीची वार्षिक बेल्ट परीक्षा उत्साहात संपन्न; गुणवंत खेळाडूंना प्रशस्तीपत्रांचे वाटप
जळगाव: पोलिस स्पोर्ट्स अकादमी व आर जे स्पोर्ट्स अकादमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली वार्षिक बेल्ट परीक्षा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. या परीक्षेमध्ये यशस्वी ठरलेल्या सर्व खेळाडू आणि विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते अधिकृत प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या पारितोषिक वितरण सोहळ्याला आर जे अकादमीचे अध्यक्ष प्राध्यापक गोपाल जोनवाल सर, संस्थेचे सचिव राजेंद्र जंजाळे सर आणि राष्ट्रीय प्रशिक्षक प्राजक्ता मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून ‘महिला बचाव सेवा संस्थेच्या’ (महाराष्ट्र राज्य) महिला प्रदेशाध्यक्ष सौ. शीतल सोनवणे उपस्थित होत्या. उपस्थितांच्या हस्ते बेल्ट परीक्षेत यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले आणि त्यांच्या पुढील क्रीडा प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी परीक्षेत सहभागी सर्व विद्यार्थी व खेळाडूंच्या वतीने उपस्थित मान्यवर, मार्गदर्शक आणि गुरुजनांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.




