इतर

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर

 मुला-मुलींना एड्स जागृती, तर मुलींना शरीर स्वच्छतेबाबत विशेष मार्गदर्शन

जळगाव  प्रतिनिधी : अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जळगाव सिव्हिल हॉस्पिटल (जिल्हा रुग्णालय) कडून आलेल्या तज्ज्ञ महिला मार्गदर्शकांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या शिबिरात सिव्हिल हॉस्पिटलच्या समुपदेशक रुपाली दीक्षित, मनिषा वानखेडे, निशिगंधा बागुल यांनी दोन वेगवेगळ्या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पहिले सत्र (मुला-मुलींसाठी संयुक्त) : कार्यक्रमाच्या पहिल्या भागात शाळांमधील इयत्ता आठवी ते दहावी मधील मुला आणि मुलींना एकत्रितपणे मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने एड्स (AIDS) आणि वैचारिक जागृती या विषयावर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला. एड्स या आजाराविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करून, त्यासंदर्भात योग्य व वैज्ञानिक दृष्टिकोन कसा ठेवावा, याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले. तर दुसरे सत्रात मुलींसाठी शरीर स्वच्छता, शारीरिक विकास, मानसिक आणि लैंगिक आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. पौगंडावस्थेत मुलींच्या शरीरात आणि मनात होणारे बदल आणि या काळात घ्यावयाची काळजी यावर शास्त्रीय माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनातून ही कार्यशाळा पार पडली. वंदना मारकड यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button