इतर

मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियान; ५०० कष्टकरी कामगारांची आरोग्य तपासणी

मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियान; ५०० कष्टकरी कामगारांची आरोग्य तपासणी

भाजपच्या पुढाकाराने जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शिबिर; डॉक्टरांचा सन्मान, मोफत औषधोपचार

जळगाव, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत मुख्यमंत्री सहायता कक्ष, महाराष्ट्र राज्य आणि भाजपा महानगर जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कष्टकरी कामगारांसाठी आयोजित आरोग्य तपासणी व औषधवाटप शिबिर उत्साहात पार पडले. शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झालेल्या या शिबिरात सुमारे ५०० कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा भाजपच्या वतीने सन्मान करण्यात आला.

शिबिराचे उद्घाटन आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील, दीपक परदेशी, दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. वठार, बाजार समिती संचालक, अशोक राठी, डॉ. अरुण पाटील, मिलिंद चौधरी, योगराज सपकाळे, इंद्रराज सपकाळे, समाधान धनगर, संतोष इंगळे, विजय वानखेडे, कौमेश सपकाळे, राजू मराठे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

विविध आजारांची तपासणी; औषधोपचारही मोफत

शिबिरात कष्टकरी कामगार बंधू-भगिनींची हृदयरोग, स्त्रीरोग, जनरल मेडिसिन, दंतविकार, नेत्रविकार, नाक-कान-घसा आणि मूत्ररोगविषयक तपासणी करण्यात आली. याशिवाय रक्ततपासण्या करून आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. दैनंदिन कामाच्या धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष होणाऱ्या कष्टकरी वर्गाला या शिबिराचा लाभ मिळाला.

या उपक्रमासाठी मुख्यमंत्री सहायता कक्ष, महाराष्ट्र राज्य, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव, शासकीय दंत महाविद्यालय जळगाव आणि महादेव हॉस्पिटल जळगाव यांचे सहकार्य लाभले.

आयोजनासाठी पदाधिकाऱ्यांचे परिश्रम

शिबिराचे समन्वयक पितांबर भावसार यांनी सूत्रसंचालन केले, तर व्यापारी आघाडीचे अशोक राठी यांनी आभार मानले. शिबिराच्या यशस्वितेसाठी विनय बाहेती, संतोष पवार, विष्णुकांत मणियार, मनोज नागला, सुनील तापडिया, दीपक महाजन, व्यापारी आघाडीचे पदाधिकारी, हमाल-मापाडी संघटनेचे पदाधिकारी आणि जी.एम. फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button