खान्देशजळगांवराजकीयशासकीय

पक्षाचा आदेश शिरसावंद्य! वैशाली पाटील यांची जिल्हा बँक निवडणुकीतून माघार

महायुतीच्या विजयासाठी घेतला निर्णय; भाजपने भरपूर काही दिले, पक्षनिष्ठेला प्राधान्य

पक्षाचा आदेश शिरसावंद्य! वैशाली पाटील यांची जिल्हा बँक निवडणुकीतून माघार

महायुतीच्या विजयासाठी घेतला निर्णय; भाजपने भरपूर काही दिले, पक्षनिष्ठेला प्राधान्य

जळगाव : पक्षाच्या आदेशाला सर्वोच्च प्राधान्य देत नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी महिला प्रतिनिधी आणि ओबीसी या दोन मतदारसंघांतून दाखल केलेले उमेदवारी अर्ज मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर) मागे घेतले. पक्षाकडून माघार घेण्याची सूचना मिळताच क्षणाचाही विलंब न करता त्या जिल्हा बँकेत दाखल झाल्या आणि त्यांनी उमेदवारी मागे घेतली.

भारतीय जनता पार्टीने आपल्याला भरपूर काही दिले आहे. त्यामुळे पक्षाचा आदेश हा आपल्यासाठी महत्त्वाचा असून पक्षाच्या निर्णयाचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे, अशी भूमिका वैशाली अमित पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीशभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण तसेच जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या सूचनेनुसार त्यांनी हा निर्णय घेतला. महायुतीच्या पॅनलच्या विजयासाठी पक्षाने दिलेल्या आदेशाचे पालन करत त्यांनी उमेदवारी माघारीचा निर्णय घेतला.

पक्षाने आजवर दिलेल्या संधी आणि जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून वैयक्तिक उमेदवारीपेक्षा पक्षाचा आदेश आणि महायुतीच्या विजयाला प्राधान्य दिल्याचे वैशाली पाटील यांच्या या निर्णयातून स्पष्ट झाले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button