जळगाव ;- ११ वीत शिकणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना जुन्या जळगावातील विठ्ठलपेठ भागात आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडून हळहळ व्यक्त होत आहे. ट्विंकल उर्फ पूजा सुरेश चौधरी (वय-१७, रा. विठ्ठल पेठ, जळगाव) असे मयत झालेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे.शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, ट्विंकल उर्फ पूजा सुरेश चौधरी ही अल्पवयीन मुलगी आई,वडील व लहान भाऊ यांच्यासोबत विठ्ठलपेठ परिसरात वास्तव्याला होती. तिने नुकतेच दहावीचे शिक्षण पूर्ण करून शहरातील का.ऊ. कोल्हे विद्यालयात अकरावीचे शिक्षण घेत होती. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ती मानसिक तणावात असल्याचे समोर येत आहे. शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी सकाळी तिची आई नातेवाईकांकडे शिरपूर येथे गेले होत्या, तर वडील हे शेतीच्या कामासाठी शेतात गेले होते. त्यावेळी दुपारी ट्विंकल ही लहान भाऊ दीपक याच्यासोबत घरीच होती. दुपारी अडीच वाजता लहान भावाला दुकानावर काही वस्तू घेण्यासाठी पाठवले होते.
त्यानंतर तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. थोड्यावेळाने लहान भाऊ दीपक घरी आल्यावर बहिणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याने आक्रोश करून नातेवाईकांना व शेजारच्यांना बोलवले. शेजारी राहणाऱ्यांनी तिला खाली उतरवून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी तपासणीअंती मयत घोषित केले. नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्याचे अस्पष्ट असून ते समजू शकले नाही .