खान्देशगुन्हेजळगांव

पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ

जळगाव : नवीन घर घेण्यासाठी विवाहितेने माहेरुन पाच लाख रुपये आणावे. यासाठी सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ केला जात होता. याप्रकरणी विवाहितेने एमआयडीसी पोलीसात दिलेल्या तक्रारीवरुन सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतना आकाश वसाणे यांचा विवाह ममुराबाद येथील आकाश वसाने यांच्यासोबत झाला आहे. विवाहिता सासरी नांदत असतांना विवाहितेच्या पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेला नवीन घर घेण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये आणावे यासाठी तगादा लावला. तसेच त्यांच्या नणंद यांनी तुझ्या आई वडीलांनी लग्नात हुंडा कमी दिला, तुला कामधंदा येत नाही असे म्हणत किरकोळ कारणावरुन ते विवाहितेसोबत वाद घालीत होते. सासरच्यांकडून • होणारा त्रास असह्य झाल्याने विवाहिता माहेरी न निघून आल्या. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी – पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पती न आकाश नथ्थू वसाणे, सासू कुसूम नथ्थू वसाणे न दोघ रा. ममुराबाद, मोठी नणंद कविता विनोद न चौधरी रा. देशमुखवाडा, पुनम मनोज सुर्यवंशी न रा. होळ धांदरणे ता. शिंदखेडा यांच्याविरुद्ध न गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button