जळगाव ;- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दि.15 रोजीचा युवा संवाद दौरा रद्द झाला असून पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारतीय जनता पक्षातर्फे गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याचे नियोजन सुरु होते. मात्र त्यात बदल होत असून दि. १५ तारखेचा दौरा पुढे ढकलण्यात येत असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. या दौऱ्यानिमित्त ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी यानिमित्त पदाधिकाऱयांची बैठक घेऊन दौरा यशस्वी करण्याचे आवाहन केले होते . दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा केव्हा होईल याची तारीख निश्चित नसल्याचे सूत्रांनी सांगितले.