निधनजळगांवशासकीय

पोलीस कर्मचारी योगेश सपकाळे यांचे निधन

खान्देश टाइम्स न्यूज | २० जुलै २०२३ | जळगाव येथील प्रशांत चौक, कांचन नगर येथील रहिवासी असलेले पोलीस कर्मचारी योगेश रघुनाथ सपकाळे (वय ४४) यांचे आज दि.२० जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.२१ जुलै रोजी सकाळी ९ वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, दोन मुले असा परिवार असून ते दिलीप व मोहन सपकाळे यांचे भाऊ होते.

योगेश सपकाळे यांची नुकतेच शहर पोलीस ठाण्यातून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात बदली झाली होती. अत्यंत मनमिळावू स्वभाव असलेल्या योगेश यांच्या निधनाने पोलीस दलात शोककळा पसरली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात ते क्राईम रायटर म्हणून काम पाहत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button