खान्देशजळगांवराजकीय

नदीम अब्दुल गफ्फार मलिक यांच्या पुढाकाराने जळगावात BLO मार्गदर्शन शिबिर

नदीम अब्दुल गफ्फार मलिक यांच्या पुढाकाराने जळगावात BLO मार्गदर्शन शिबिर

मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती व पत्ता बदलासाठी नागरिकांना मिळणार एकाच ठिकाणी सुविधा

जळगाव | प्रतिनिधी मतदार यादीतील नाव नोंदणी, नावातील दुरुस्ती, पत्ता बदल तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विविध कामांसाठी नागरिकांना मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) जळगावचे जिल्हा कार्याध्यक्ष नदीम अब्दुल गफ्फार मलिक यांच्या पुढाकाराने जळगाव येथे BLO मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नाव किंवा तपशील दुरुस्ती, पत्ता बदल, मतदार ओळखपत्राशी संबंधित प्रक्रिया तसेच आधार कार्डशी निगडित आवश्यक बाबींविषयी नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

हे शिबिर रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत नॅशनल हॉल, शनि पेठ, डॉ. अब्दुल गफ्फार मलिक हाऊसजवळ, वॉर्ड क्रमांक ४, जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.

मतदान प्रक्रियेत अधिकाधिक नागरिकांचा सहभाग वाढावा आणि मतदारांना त्यांच्या अडचणींचे निराकरण एकाच ठिकाणी व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष नदीम अब्दुल गफ्फार मलिक यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button