खान्देशजळगांवसामाजिक

नाझिया इलाही खानवर कारवाईची मागणी; सुन्नी मुस्लिम बांधवांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना साकडे

नाझिया इलाही खानवर कारवाईची मागणी; सुन्नी मुस्लिम बांधवांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना साकडे

जळगाव (प्रतिनिधी) : इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद (स.) आणि त्यांच्या पत्नींबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत नाझिया इलाही खान हिच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सुन्नी मुस्लिम बांधवांनी केली आहे. याबाबत जळगाव जिल्ह्यातील सुन्नी मुस्लिम बांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना तक्रार अर्ज सादर करून संबंधित व्यक्तीला तातडीने अटक करण्याची मागणी केली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हजरत मुहम्मद (स.) आणि त्यांच्या पत्नींबाबत कथितपणे चुकीची व आक्षेपार्ह विधाने करण्यात आली असून, त्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. संबंधित प्रकरणात त्वरित गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच, संबंधित व्यक्तीवर कारवाई न झाल्यास सुन्नी मुस्लिम बांधवांकडून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला आहे.

यावेळी सुन्नी जामा मस्जिद जळगाव व सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगावचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली, रशीद कुरैशी, सय्यद उमर, फारूख शौकत तंवर, अमान बिलाल, मुस्तकीम हमीद, परवेझ पटवे, मोईन अली यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

फोटो : जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करताना सुन्नी मुस्लिम बांधव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button