खान्देशजळगांवसामाजिक

शासकीय शाळांच्या विकासासाठी जळगाव एकता संघटनेचा पुढाकार

शासकीय शाळांच्या विकासासाठी जळगाव एकता संघटनेचा पुढाकार

यावल तालुक्यातील दहिगाव जिल्हा परिषद उर्दू शाळेला भेट; क्रीडा साहित्य व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सहकार्याची घोषणा

जळगाव : शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच क्रीडा, सांस्कृतिक आणि इतर आवश्यक सुविधा मिळाव्यात, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाचा सहभाग वाढावा, यासाठी जळगाव एकता संघटनेने पुढाकार घेतला आहे. शहरापासून ग्रामीण भागातील विविध शाळांना भेटी देऊन शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीशी संवाद साधत शाळांच्या गरजा जाणून घेतल्या जात आहेत.

दहिगाव शाळेला भेट

या उपक्रमांतर्गत जळगाव एकता संघटनेचे समन्वयक फारूक शेख यांच्यासह हाफिज रहीम पटेल, डॅनियल शेख, मौलाना गुफरान आणि नजमुद्दीन शेख यांनी यावल तालुक्यातील दहिगाव येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच शाळेत उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेण्यात आली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि कौशल्याची कमतरता नाही. योग्य मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि आवश्यक सुविधा मिळाल्यास हे विद्यार्थी विविध क्षेत्रांत मोठे यश संपादन करू शकतात, असे फारूक शेख यांनी सांगितले.

क्रीडा साहित्य व सुविधांसाठी सहकार्य

शाळेसाठी आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या इतर सुविधांसाठीही सहकार्य करण्याची घोषणा फारूक शेख यांनी केली. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासासोबतच क्रीडा आणि इतर उपक्रमांमध्येही उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमाचे शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी स्वागत केले.

शहरापासून ग्रामीण शाळांपर्यंत उपक्रम

जळगाव एकता संघटनेच्या माध्यमातून जळगाव महानगरपालिका शाळांसोबतच जिल्हा परिषद शाळांनाही आवश्यक साहित्य व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाळधी, नशिराबाद, शिरसोली, पाहूर, पारधी यांसह विविध ठिकाणच्या शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या गरजा आणि शाळांमधील उपलब्ध सुविधांचा आढावा घेण्यात आला आहे.

शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाचीही जबाबदारी आहे. दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी पुढे येऊन शाळांना क्रीडा साहित्य, शैक्षणिक साधने आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले.

दहिगावमध्ये शिक्षक, समिती सदस्य व ग्रामस्थांची उपस्थिती

दहिगाव येथील कार्यक्रमास जळगाव एकता संघटनेचे हाफिज रहीम पटेल, नजमुद्दीन शेख, डॅनियल शेख, मौलाना गुफरान शेख, साकळीचे शिक्षक तज्ज्ञ असलम सर तसेच यावल बिरादरीचे हाफिज शेख उपस्थित होते.

शाळेचे मुख्याध्यापक शेख कुतुबुद्दीन गयासुद्दीन, उपशिक्षक शेख सुलेमान शेख लुकमान, पदवीधर शिक्षक मजीद खान यासीन खान आणि पदवीधर शिक्षिका नगमा बानो शेख सत्तार उपस्थित होते.

शाळा समितीचे सदस्य जाफर खान निसार खान, हारून सुभान पटेल, तस्लीम खान रसूल खान, अजमल खान, इकबाल पिंजारी, शकील पटेल यांच्यासह हाजी मुख्तार मेंबर, शेख वजीर शेख सुपडू, सत्तार मेंबर, बिरहम पठाण, अखिल भाईसाहेब, शेख इकबाल भाईसाहेब, इमरान भाई, मोबाईलवाले मोसिन मेंबर साहेब तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रत्येक विद्यार्थी भविष्यातील आधारस्तंभ’

“शासकीय शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या समाजाच्या भविष्याचा आधारस्तंभ आहे. त्याला संधी, सुविधा आणि प्रोत्साहन देणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. जळगाव एकता संघटनेचा हा उपक्रम यापुढेही सातत्याने सुरू राहील.”
— फारूक शेख, समन्वयक, जळगाव एकता संघटना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button