जळगाव ;- तालुक्यातील कुसुंबा गावी असणाऱ्या बेलदारवाडी येथे भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने पोटावर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना १५ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली महती अशी कि, कुसुंबा येथील रहिवाशी ईश्वर निवृत्ती लोहार हवाय २४ हा तरुण बैठक हॉलच्या मागे ,कुसुंबा येथे राहत असून मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. १५ रोजी बेलदारवाडी येथे रात्री ८ वाजेच्या सुमारास आरोपी निलेश कोळी हा ओम साई राम मित्र मंडळाच्या देवी बसविण्याच्या ठिकाणी आला असता त्याचे कृष्णा भालेराव यांच्याशी भांडण सुरु असताना हे भांडण सोडविण्यासाठी ईश्वर लोहार हा गेला असता आरोपी निलेश याला याचा राग आल्याने त्याने ईश्वर याला शिवीगाळ करून हातातील धारदार शस्त्राने पोटावर वार करून गंभीर जखमी केले . याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला आरोपी निलेश कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उप निरीक्षक अनिस शेख करीत आहे.