खान्देशजळगांव

यावल वन विभागातील वैजापूर वन क्षेत्रात विदेशी पक्षांची नोंद

यावल वन विभागातील वैजापूर वन क्षेत्रात विदेशी पक्षांची नोंद

यावल प्रतिनिधी

यावल वनविभागातील वैजापूर वनक्षेत्रात Ruddy shelduck (चक्रवाक) व lesser whistling duck ह्या स्थलांतरित पक्षांची काल गस्ती दरम्यान नोंद घेण्यात आली.


1) Brahmhiny Duck, चक्रवाक ( ब्राम्हणी बदक)
2) lesser whistling duck.
चक्रवाक हा साधारण 66 सें. मी. आकारमानाचा पक्षी आहे. चक्रवाक नर केशरी-बदामी रंगाचा असून त्याच्या डोक्याचा आणि मानेचा रंग त्यामानाने थोडा फिकट असतो. त्याच्या मानेभोवताली काळे वर्तुळ (काळा कंठ), पंखांत काळेपांढरे आणि हिरवे पट्टे असून शेपूट काळी असते. मादी नरासारखीच पण तिचे रंग फिकट असतात. मादीच्या मानेभोवती काळे वर्तुळ (काळा कंठ) नसते.चक्रवाक हे बहुतकरून भारतात आढळणारे स्थलांतरित बदक आहे. अतिदक्षिण भारताचा प्रदेश वगळता संपूर्ण भारतभर ते हिवाळ्यात आढळते. तसेच *बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार, चीन या देशांचा काही भाग आणि आफ्रिकेतील इथियोपिया* येथेही यांचे वास्तव्य आहे. हे पक्षी तलावात जोडीने किंवा लहान थव्याने विहार करतात त्यातही तलावांच्या किनाऱ्याकडे राहणे जास्त पसंत करतात. सध्या हा पक्षी IUCN मध्ये संकटग्रस्त म्हणून ओळखला जात आहे, कारण आधी हजारो च्या संख्येने आढळणारा चक्रवाक कमी प्रमाणात दिसू लागला आहे,या आधी ह्या पक्षाची जळगांव जिल्यातील हतनूर IBA important bird area, जलाशावयवर नोंद आहे तसेच तेथे संख्येने आढळतात. आतापर्यंतच्या पक्षि निरीक्षणाचा अनुभवानंतर सगळ्यात जास्त आनंद देऊन जाणारा हा पक्षि, जवळून पाहण्यास मिळाला, हा पक्षी अजून 1 महिना वैजापूर वनक्षेत्रात वास्तव्य करणार आहे तसेच हा पक्षी जमिनीपासून,6000 ते 7000 फुटा पर्यंत उंचावर उडून स्थलांतरित होत असतो,
_*मार्गदर्शन,म. उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगांव, म. सहाय्यक वनसंरक्षक चोपडा.यावल, म. वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर.*_
*सदरच्या निरीक्षणं दरम्यान माझ्यासोबत होते, वनरक्षक संदीप भोई, विवेक पावरा, गणेश बारेला, जुबेर तडवी, समीर तडवी.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button