
नागपुरातून आणलेला लसुन जळगावात पकडला , एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव प्रतिनिधी नागपूर येथून चोरून आणलेला लसणाचा साठा जळगाव येथील सुप्रीम कॉलनी जवळील साहित्य नगर मध्ये जप्त केल्याची कारवाई एमआयडीसी पोलीस यांनी केले असून याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की
एका बंद बेकरीत चोरीच्या लसणाच्या गोण्या साठवून ठेवलेल्या असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती त्यानुसार एका बंद बेकरी मध्ये
९७ गोण्या लसणाने भरलेल्या आढळल्या. या लसणाची एकूण किंमत ४ लाख ८५ हजार रुपये असल्याचे तपासणीत उघड झाले. बेकरी मालक ईश्वर प्रकाश राठोड यांना विचारले असता, त्यांना सांगितले की, त्यांचा चुलत भाऊ विनोद गणेश रुढे याने हा माल कुठूनतरी विकत आणला आहे, पण त्याच्याकडे खरेदीचे कोणतेही बिले नाहीत. त्याने फक्त बेकरीमध्ये त्या गोण्यांचा साठा केला होता. यावर संशय व्यक्त करत पोलिसांनी माल जप्त केला आणि विनोद रुढे याच्यावर गुन्हा दाखल केला.
अधिक तपास करतांना, हा माल नागपूरमधील श्याम रमेश मनवाणी यांच्या टाटा ओनियन कंपनीचा असल्याचे स्पष्ट झाले. श्याम मनवाणी यांनी लसूण नागपूरहून बुखारो रांची येथे पाठवण्यासाठी महिंद्रा टेम्पो चालक विनोद रुढे याच्या ताब्यात दिला होता. मात्र, विनोद रुढे याने माल पोहोचविण्याऐवजी अपहर करून साठवून ठेवला होता.
एमआयडीसी पोलिसांनी माहिती मिळताच, विकल्या जाण्याच्या आधीच तो माल जप्त करण्यात यश मिळवले. श्याम मनवाणी यांना त्यांचा माल परत मिळाल्याने त्यांनी जळगाव पोलिसांचे आभार व्यक्त केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली.