इतर

“रागाने का बघतोस?” म्हणत तरुणावर लाकडी दांडक्याने हल्ला

रागाने का बघतोस?” म्हणत तरुणावर लाकडी दांडक्याने हल्ला

जळगाव (प्रतिनिधी):माझ्याकडे रागाने का बघतोस?” या कारणावरून एकाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना दि. ६ जून रोजी सकाळी ११ वाजता जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील बसस्थानकाजवळ घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद ईश्वर धनगर (वय ३५, रा. नंदगाव) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्यावर रुपेश उर्फ वेदांत पांडुरंग धनगर (रा. नंदगाव) याने अचानक हल्ला केला. दरम्यान, त्याने शरद यांना “तु माझ्याकडे रागाने का बघतोस?” असे विचारून शिवीगाळ केली आणि हातातील लाकडी दांडक्याने हात, खांदा आणि पायावर मारहाण करून जखमी केले.

तसेच, “पोलिसांत तक्रार केल्यास तुला आणि पोलिसांना पाहून घेईन, तुम्हाला सोडणार नाही,” अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button