खान्देशजळगांवशासकीय

मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त ६७ दात्यांचे रक्तदान

पैलवान शिवाजी रामदास पाटील यांचा ५७ वेळा रक्तदानाचा प्रेरणादायी विक्रम

मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त ६७ दात्यांचे रक्तदान

पैलवान शिवाजी रामदास पाटील यांचा ५७ वेळा रक्तदानाचा प्रेरणादायी विक्रम

जळगांव  “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संदेशाला प्रत्यक्ष कृतीत उतरवत मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात तब्बल ६७ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समाजापुढे मानवतेचा आदर्श निर्माण केला. या रक्तदान शिबिरात गरजू रुग्णांच्या जीवनासाठी आशेचा किरण ठरणारे अमूल्य रक्त संकलित करण्यात आले.

या प्रसंगी गिरीष महाजन वैद्यकीय कक्षाचे आरोग्यदूत पैलवान शिवाजी रामदास पाटील यांनी तब्बल ५७ वेळा रक्तदान करून समाजसेवेचा प्रेरणादायी विक्रम नोंदविला. “रक्तदानामुळे एखाद्याला नवजीवन मिळत असेल तर त्यापेक्षा मोठे समाधान नाही,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या कार्याचे उपस्थितांनी जोरदार कौतुक केले.

रक्तदान शिबिराला आमदार राजू मामा भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी डॉ. मनोज टोके यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जी.एम. फाउंडेशन जळगावच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उदय भालेराव, नगरसेवक सुनील खडके नगरसेविका उज्वलाताई बेंडाळे, सुचिता हाडा, पितांबर भावसार, होनाजी चव्हाण, भैय्या पाटील, कल्पेश बेलदार, संतोष पवार क्षितिज भालेराव, तुकाराम कोल्हे आश्विन सैंदाणे, सचिन धनगर, हेमंत पाटील आदींनी शिबिराच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेतला.

रक्त संकलन प्रक्रियेसाठी रक्त संक्रमण अधिकारी डॉ. हर्षदा पाडवी, डॉ. श्रद्धा गायकवाड, डॉ. फैज सय्यद तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ दिपक होनमाने, अश्विनी यादव, रेहान शेख यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. समाजसेवा अधीक्षक प्रदीप पाडावी, नर्सिंग अधिकारी सतिश गोडीलोहर, कक्षसेवक पवन तायडे आणि वाहनचालक जगन्नाथ जाधव यांनीही मोलाचे सहकार्य केले.

आजच्या धावपळीच्या जीवनात अपघात, शस्त्रक्रिया, प्रसूती किंवा गंभीर आजारांमुळे अनेकांना रक्ताची तातडीची गरज भासते. अशावेळी रक्तदाते हेच खऱ्या अर्थाने जीवनदाते ठरतात. एका रक्तदात्यामुळे तीन रुग्णांचे प्राण वाचू शकतात, ही भावना मनात ठेवून अनेक युवकांनी या शिबिरात सहभाग घेतला.

मानवतेचा संदेश देणारे हे रक्तदान शिबिर समाजासाठी प्रेरणादायी ठरले असून “वाढदिवस साजरा करण्यापेक्षा जीव वाचविण्याचा संकल्प मोठा” असा सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button