खान्देशजळगांवशासकीयसामाजिक

जळगावा जिल्ह्यात ७९१ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

१२ जून रोजी विशेष ग्रामसभेत आरक्षण सोडत

जळगावा जिल्ह्यात ७९१ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

१२ जून रोजी विशेष ग्रामसभेत आरक्षण सोडत

जळगाव: प्रतिनिधी जिल्ह्यातील राजकीय हवा आता थेट गावपातळीवर तापणार आहे. मुदत संपलेल्या तब्बल ७९१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा अधिकृत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. येत्या १२ जून रोजी विशेष ग्रामसभेत ही आरक्षण सोडत काढली जाणार असून, १७ जुलै रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल. ऐन पावसाळ्यात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या राजकारणाचा धुरळा उडणार असल्याने, आरक्षण काय निघणार याकडे डोळे लावून बसलेल्या इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

या निवडणूक प्रक्रियेत नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी (ओबीसी) २७ टक्क्यांपर्यंत जागा राखून ठेवल्या जातील. मात्र, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि ओबीसी यांचे एकत्रित आरक्षण एकूण जागांच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही, याची काटेकोर दक्षता घेण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात ही प्रक्रिया पारदर्शक वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.

आरक्षण प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे

• ८ जून : विशेष ग्रामसभेची नोटीस प्रसिद्ध
• १२ जून : विशेष ग्रामसभेत आरक्षण सोडत
• १९ जून : प्रभागनिहाय आरक्षणाचा प्रारूप जाहीर
• १९ ते २५ जून : हरकती व सूचना स्वीकारण्याची मुदत
• ३ जुलै : उपविभागीय अधिकाऱ्यांचा अंतिम अभिप्राय
• ८ जुलै : जिल्हाधिकाऱ्यांकडून अंतिम मंजुरी
• १० जुलै : अंतिम प्रभाग रचना व आरक्षण जाहीर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button