सामाजिकराजकीय

चोपडा येथे अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अन्नदानाचा प्रेरणादायी उपक्रम

चोपडा येथे अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अन्नदानाचा प्रेरणादायी उपक्रम

चोपदार l प्रतिनिधी l दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त 21 जुलै रोजी चोपडा येथील आश्रमशाळेत अन्नदानाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमातून समाजातील गरजू, निराधार आणि वंचित घटकांप्रती सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवक काँग्रेस फैजपूर शहराध्यक्ष कृष्णा चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जितेंद्र वर्मा, पंकज मिस्त्री, वेदांत कुलकर्णी आणि जतिन सूर्यवंशी यांनीही सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शेख कुर्बानभाई, रज्जाकभाई आणि आवेश भांजा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अमर संस्था, चोपडा यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.
या अन्नदान उपक्रमाचा लाभ बेवारस मनोरुग्ण, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, बालकाश्रमातील मुले तसेच मानवसेवातीर्थातील लाभार्थी यांनी घेतला. उपस्थितांनी या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करत, समाजातील गरजूंसाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.
सामाजिक सेवेला वाहिलेल्या या उपक्रमातून दिवंगत अजितदादा पवार यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button