सावदा नगरपालिकेत महाराणा प्रताप जयंती उत्साहात

सावदा नगरपालिकेत महाराणा प्रताप जयंती उत्साहात
नगराध्यक्षा रेणुका पाटील यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण; नगरसेवक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती
सावदा, प्रतिनिधी : रावेर तालुक्यातील सावदा नगरपालिकेत हिंदवी स्वराज्याचे शूर योद्धा तथा मेवाडचे महान राजे महाराणा प्रताप यांची जयंती बुधवारी (दि. १७) उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी सावदा नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. रेणुका पाटील यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर नगरसेविका सौ. रेखा राजेश वानखेडे, सौ. रंजना जितेंद्र भारंबे, सौ. प्रतीक्षा मनीष भंगाळे तसेच पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी प्रियंका जैन यांनीही प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली.
कार्यक्रमास नगरसेवक सचिन भराटे, नकुल बेंडाळे, बंटी जंगले, फिरोज खान अब्दार खान यांच्यासह नगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी महाराणा प्रताप यांच्या शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेच्या कार्याचा गौरव करण्यात आला.





