जुन्या वादातून तरुणावर लाकडी काठीने हल्ला

जुन्या वादातून तरुणावर लाकडी काठीने हल्ला
खांदा व हाताला दुखापत; संशयिताविरुद्ध नशिराबाद पोलिसांत गुन्हा
जळगाव | प्रतिनिधी
जुन्या वादाच्या कारणावरून नशिराबाद येथील भवानी नगर परिसरात एका ३२ वर्षीय तरुणाला लाकडी काठीने मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलिसांनी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापू सुपडू भोई (वय ३२, रा. भवानी नगर, नशिराबाद) यांना ४ जुलै रोजी सकाळी सुमारे ७ वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण करण्यात आली. या घटनेत त्यांच्या उजव्या खांद्याला व हाताला दुखापत झाली.
या प्रकरणी बापू भोई यांनी ७ जुलै रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गणेश प्रकाश कोळी (रा. भवानी नगर, नशिराबाद) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत विरणारे करीत आहेत.





