गुन्हे

रामानंद नगर पोलिसांची धडक कारवाई: घरफोडीचे आरोपी अटक, चोरीचा मुद्देमाल हस्तगत!

रामानंद नगर पोलिसांची धडक कारवाई: घरफोडीचे आरोपी अटक, चोरीचा मुद्देमाल हस्तगत!

जळगाव l प्रतिनिधी l रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्राळा परिसरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरी गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नेमकी काय आहे घटना?

दिनांक ०७ जुलै २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास पिंप्राळा परिसरातील सोमानी मार्केटमधील एका पान मसाल्याचे दुकान अज्ञात चोरट्याने फोडले होते. दुकानातून विविध कंपन्यांचे सिगारेटचे १० बॉक्स आणि नगदी ५,००० रुपये असा एकूण ३७,८०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या प्रकरणी तक्रारदार सुरेश नरवाडे यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता (CCTNS गुरनं २०४/२०२६ BNS कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४)).

गुप्त माहिती आणि CCTV फुटेजवरून आरोपींना अटक :

गुन्हा दाखल झाल्यापासून रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पथक आरोपींचा शोध घेत होते. पोलीस हवालदार सुधाकर अंभोरे आणि सुशिल चौधरी यांना मिळालेली गुप्त बातमी तसेच परिसरातील CCTV फुटेजची तपासणी करून संशयितांची माहिती मिळवली.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व त्यांच्या पथकाने पिंप्राळा परिसरात सापळा रचून खालील दोन आरोपींना ताब्यात घेतले:

१. सिद्धार्थ विनोद आढाळे (वय १९ वर्षे, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव)

२. दिपक भगवान सोनवणे (वय २० वर्षे, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव)

पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी सदर घरफोडीची कबुली दिली. त्यानंतर दोन्ही आरोपींना दिनांक २२ जुलै २०२६ रोजी रीतसर अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेला पूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तपास पथक :

ही धडक कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावित आणि SDPO श्री. नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तपासात पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोह/ सुधाकर अंभोरे, सुशिल चौधरी, अतुल चौधरी आणि पोशि/ सागर नन्नवरे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button