खान्देशअपघातगुन्हेजळगांव

जळगाव जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक; राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

जळगाव जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक; राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

जळगाव: जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीविरोधात जळगाव पोलीस दलाने अत्यंत आक्रमक मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी धडक कारवाया करत हजारो लिटर कच्चे रसायन, दारू निर्मितीचे साहित्य आणि भट्ट्या थेट उद्ध्वस्त केल्या आहेत. पोलिसांच्या या अचानक झालेल्या कारवाईच्या धडाक्याने जिल्ह्यातील हातभट्टी माफियांचे धाबे दणाणले आहेत.

दुर्गम भागात पोलिसांची धाड; हजारो लिटर रसायन नष्ट

जिल्ह्यातील ग्रामीण तसेच दुर्गम भागांत लपून-छपून सुरू असलेल्या अवैध हातभट्ट्यांची गुप्त माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्यांच्या पथकांनी ठिकठिकाणी छापे टाकले. या कारवाईत दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे मोठ्या प्रमाणातील कच्चे रसायन व निर्मितीचे साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले, तर काही ठिकाणी तयार दारूही जप्त करण्यात आली आहे.

अवैध हातभट्टी दारूमुळे ग्रामीण भागात अनेक सामाजिक तंटे आणि नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत होते. त्यामुळे पोलिसांनी उघडलेल्या या मोहिमेचे सर्वसामान्य नागरिकांमधून स्वागत केले जात असून या व्यवसायाला चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

उत्पादन शुल्क विभागाची गस्त अन् कामगिरी कुठे?

एकीकडे पोलीस दल गुन्हेगारीसह अवैध दारू व्यवसायावर धडक कारवाई करत असताना, दुसरीकडे या कारवाईमुळे ‘राज्य उत्पादन शुल्क विभाग’ (Excise Department) नेमका करतोय तरी काय? असा तीव्र सवाल आता उपस्थित केला जात आहे. वास्तविक पाहता अवैध दारू निर्मिती, हातभट्ट्या आणि बेकायदेशीर विक्रीवर नियंत्रण ठेवण्याची मुख्य कायदेशीर जबाबदारी ही उत्पादन शुल्क विभागाची आहे. मात्र, या विभागाने जिल्ह्यात आतापर्यंत किती हातभट्ट्यांवर कारवाई केली,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button