

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडुन
आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव, प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव कार्यक्षेत्रातील परिवहनेतर संवर्गातील दुचाकी वाहनांसाठी एमएच-१९/ईवाय-०००१ ते ९९९९ ही नवीन नोंदणी मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या मालिकेतील आकर्षक अथवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी इच्छुक वाहनधारकांनी दि. २४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्ज सादर करावेत.
अर्जासोबत विहित शासकीय शुल्काचा धनाकर्ष (DD), अर्जदाराचे नाव, पत्त्याचा पुरावा व आधारकार्डशी संलग्न मोबाईल क्रमांक सादर करणे आवश्यक आहे. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास वाढीव शुल्काद्वारे पसंती क्रमांक देण्यात येईल. वाढीव शुल्काचा DD दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत बंद लिफाफ्यात सादर करावा.
अधिक माहितीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरुड यांनी केले आहे.




