
स्वतःवर गोळी झाडून २७ वर्षीय तरुणाची आत्महत्या
चिनावलमधील धक्कादायक घटना; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष

सावदा, प्रतिनिधी : सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिनावल येथे २७ वर्षीय तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. निर्मल युवराज महाजन (वय २७) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निर्मल महाजन हा आपल्या राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत असताना ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला.
घटनास्थळावरून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल (गावठी कट्टा) आणि दोन जिवंत राऊंड जप्त केले आहेत. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करीत आहेत.
मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. निर्मल महाजन हे शेती व्यवसायासोबत केळीचा व्यापार करीत होते. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांनी आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणातून केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेमुळे चिनावल परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आत्महत्येमागील कारणाचा शोध सावदा पोलीस घेत आहेत.




