महाराष्ट्रखान्देशजळगांवराजकीयशासकीयसामाजिक

संघर्षातून उभा राहिलेला कलाकार काळाच्या पडद्याआड ; ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन 

75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ; चित्रपट सृष्टीवर  शोककळा

संघर्षातून उभा राहिलेला कलाकार काळाच्या पडद्याआड ; ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन 

75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ; चित्रपट सृष्टीवर  शोककळा

पणजी, प्रतिनिधी : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. गोव्यातील त्यांच्या घरी पहाटे अचानक ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे सीपीआर दिला, मात्र त्यांना वाचविणे शक्य झाले नाही.

नाना पाटेकर यांच्या निधनाची माहिती त्यांचा मुलगा मल्हार यांनी दिली. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

नानांच्या अभिनयामागे त्यांच्या आयुष्यातील संघर्षाचा मोठा वाटा होता. आर्थिक अडचणींमुळे लहान वयातच त्यांना काम करावे लागले. वडिलांचा व्यवसाय बंद पडल्यानंतर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. त्यावेळी अवघ्या तेराव्या वर्षी त्यांनी चित्रपटांचे पोस्टर रंगविण्याचे काम केले.

या अनुभवांनी त्यांच्या मनावर खोल परिणाम केला. पुढे अभिनयाच्या क्षेत्रात आल्यानंतर त्यांनी आपल्या आयुष्यातील अनुभव आणि संवेदनशीलता व्यक्तिरेखांमध्ये उतरवली. त्यामुळे त्यांच्या भूमिका केवळ पडद्यावरच्या व्यक्तिरेखा न राहता त्या जिवंत वाटत असत.

नाना पाटेकर यांच्या आयुष्यात वैयक्तिक दुःखाचे प्रसंगही कमी नव्हते. न्यूनगंड, आर्थिक संघर्ष आणि पहिल्या मुलाच्या निधनाचा धक्का अशा अनेक कठीण प्रसंगांना त्यांनी सामोरे जात आपली कारकीर्द उभी केली.

त्यांच्या प्रभावी अभिनयाने ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’, ‘प्रहार’, ‘तिरंगा’ यांसारख्या चित्रपटांना वेगळी उंची मिळाली. नानांची संवादफेक आणि अभिनयाची शैली त्यांच्या चाहत्यांच्या कायम स्मरणात राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button