खान्देशगुन्हेजळगांव

नवरीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड लांबविणाऱ्या आरोपीला अटक

अवघ्या तीन तासात गुन्हा उघड ; चाळीसगाव शहर पोलिसांची कारवाई

चाऴीसगाव;- शहरातील हॉटेल कलमशांती पॅलेस या ठिकाणी ७ रोजी सरोज मुंकुद देशपांडे यांच्या मुलीचा लग्न समारंभ आयोजीत करण्यात आला होता. यावेळी नवरीचे सोन्याचे दागीणे, रोख रुपये व ऍ़पल कंपनीचा आयफोन 13 हा मोबाईल असा मुद्देमाल त्यांनी त्यांच्या पर्स मध्ये होता . मात्र हि पर्स एका भामट्या चोराने लांबविल्याचा प्रकार घडल्याने नावरीकडील मंडळी हैराण झाले होते. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र चाळीसगाव पोलिसांनी त्वरित चोरट्याचा शोध घेऊन त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले.

सदरचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडल्यानंतर पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांच्या आदेशान्वये .अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे तसेच .सहा.पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोउनि.योगेश माळी, पोना/दिपक पाटील, पोकॉ/नंदु महाजन, पोकॉ/अजय पाटील, पोहेकॉ/राहुल सोनवणे, पोकॉ/विनोद खैरनार, पोकॉ/रविंद्र बच्छे, पोकॉ/आशुतोष सोनवणे, पोहेकॉ/नितीन वाल्हे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन फिर्यादी व साक्षीदार यांना सविस्तर विचारपुस करुन तसेच घटनास्थळी आलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी हॉटेलमधील व रोडवरील असलेल्या इतर हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज चेक करुन तसेच धुळे-कन्नड बायपास रोडवरील हॉटेल चालक यांना चोरी करणाऱ्या इसमाचे फुटेज दाखवुन व इतर तांत्रीक माहीतीच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपीला बायपास रोडवरील कोदगाव चौफुली जवळ मुद्देमालासह अटक केली.

सीसीटीव्ही फुटेज व फिर्यादी यांनी सांगीतलेली सविस्तर हकीकत व मिळालेल्या माहीतीवरुन सदर गुन्ह्यामध्ये आरोपी बालवीर माखन सिसोदीया वय-19 वर्षे रा. गुलखेडी, ता.पचोर, जि.राजगड (मध्यप्रदेश) याचा चाळीसगाव शहर परिसरात शोध घेता तो मिळून आल्याने त्यास गुन्ह्यामध्ये ताब्यात घेवुन अटक कऱण्यात आलेली आहे. त्याच्याकडुन चोरीस गेलेल्या 6,85,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरचा गुन्हा पोलिसांनी खबर प्राप्त होताच 3 तासांपेक्षा कमी कालावधीत उघडकीस आणल्यामुळे पोलिसांचे कामाचे वधू व वराकडील नातेवाईकांनी कौतुक करून गौरवण्यात आले ..सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोना/3122 दिपक पाटील तसेच गुन्हे शोध पथकाचे अंमलदार असे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button