इतर

नवीन वीज मीटरसाठी एक हजारांची लाच मागणारा वरिष्ठ तंत्रज्ञ अटकेत

भुसावळ ;- वीज कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञाला नवीन वीज मीटर बसवून देण्यासाठी तडजोडीअंती एक हजारांची लाच मागणार्‍या वरणगाव शहरातील जळगाव एसीबीने मंगळवारी सायंकाळी अटक केली. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

अमीन शहा करामत शहा (३३, वरणगाव शहर ता. भुसावळ) असे लाचखोराचे नाव आहे. ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक एन.एन. जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, प्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button