इतर

अडावद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात ५७६ लाभार्थ्यांनी घेतला लाभ

अडावद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात ५७६ लाभार्थ्यांनी घेतला लाभ

अडावद ता. चोपडा l प्रतिनिधी
येथे क्षत्रिय माळी समाज मंगल कार्यालयात राज्य शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” अंतर्गत चोपडा तालुक्यातील अडावद मंडळातील ९ गावांसाठी एकत्रित महसूल व सर्वसमावेशक शासकीय सेवा शिबीराचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन आमदार आण्णासाहेब प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून विविध योजनेचे प्रमाणपत्रे व धनादेश प्रदान केले.
नागरिक सहभाग व लाभ- शिबिरात ७०० ते ८०० नागरिकांनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला. शासनाच्या विविध विभागांनी एकत्रितपणे सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच प्रशासनाची सुविधा सुलभतेने मिळाली.
यावेळी अमळनेर उपविभागीय अधिकारी श्री. नितीनकुमार मुंडावरे, उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा आण्णासाहेब घोलप, तहसीलदार, श्री. भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी चोपडा पंचायत समिती अनिल विसावे, आदिवासी निवासी नायब तहसीलदार योगेश पाटील, तालुका कृषी अधिकारी दिपक साळुंखे, प्रभारी सरपंच विजीता हरिश पाटील, माजी लोकनियुक्त सरपंच भावनाताई माळी, माजी सरपंच भारतीताई महाजन, वडगाव बु. चे माजी सरपंच नामदेव पाटील, जेष्ठ शिवसैनिक शेटे सर विकासो संचालक लोकेश काबरा, वर्डीचे माजी सरपंच रवींद्र पाटील मंगल इंगळे चंद्रशेखर साळूंखे सर प्रविण सोनवणे पिंप्री सरपंच वकील इंगळे ,वटार सरपंच गोपाल ठाकरे, सुटकार सरपंच रवींद्र ठाकरे, मितावली सरपंच ज्ञानेश्वर इंगळे प्रमोद बाविस्कर, चांदसनी उपसरपंच नामदेव धनगर,सचिन महाजन,पी. आर. माळी,नंदु पाटील,हरिष पाटील,बापु कोळी, कृष्णा महाजन,जावेद खान , कालू भाऊ,आदी सह शिवसैनिक,ग्रामस्थ व सर्व तालुका स्तरीय अधिकारी, कर्मचारी व मंडळ स्तरावरील यंत्रणा उपस्थित होते

छत्रिय माळी समाज मंगल कार्यालय, अडावद येथे राज्य शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” अंतर्गत, चोपडा तालुक्यातील अडावद मंडळातील ९ गावांसाठी एकत्रित महसूल व सर्वसमावेशक शासकीय सेवा शिबीराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते पार पडले. त्यांनी यावेळी लाभार्थ्यांशी संवाद साधून विविध योजनेची प्रमाणपत्रे व धनादेश वितरित केले.

नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

या शिबिराला ७०० ते ८०० नागरिकांनी उपस्थिती लावली. यामध्ये एकूण ५७६ लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेतला. शासनाच्या विविध विभागांनी एकत्रितपणे सेवा उपलब्ध केल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच प्रशासनाची सेवा मिळाल्यामुळे समाधान व्यक्त झाले.

उपविभागीय अधिकारी अमळनेर येथील नितीनकुमार मुंडावरे,उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा आण्णासाहेब घोलप,तहसीलदार भाऊसाहेब थोरात,
गटविकास अधिकारी चोपडा पंचायत समिती अनिल विसावे,आदिवासी निवासी नायब तहसीलदार योगेश पाटील,तालुका कृषी अधिकारी दिपक साळुंखे,
प्रभारी सरपंच विजीता हरिश पाटील,माजी लोकनियुक्त सरपंच भावनाताई माळी,माजी सरपंच भारतीताई महाजन,
वडगाव बु. चे माजी सरपंच नामदेव पाटील,ज्येष्ठ शिवसैनिक शेटे सर,विकासो संचालक लोकेश काबरा,
वर्डीचे माजी सरपंच रवींद्र पाटील,मंगल इंगळे, चंद्रशेखरसाळुंखे सर, प्रविण सोनवणे,पिंप्री सरपंच वकील इंगळे,वटार सरपंच गोपाल ठाकरे,सुटकार सरपंच रवींद्र ठाकरे,मितावली सरपंच ज्ञानेश्वर इंगळे,प्रमोद बाविस्कर, चांदसनी उपसरपंच नामदेव धनगर,सचिन महाजन, पी. आर. माळी, नंदु पाटील,हरिष पाटील, बापू कोळी, कृष्णा महाजन, जावेद खान, कालू भाऊ,आदी शिवसैनिक, ग्रामस्थ तसेच तालुका आणि मंडळ स्तरावरील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button