खान्देशजळगांवसामाजिक

गणेश विसर्जनानंतर ‘अनुभूती’च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला मेहरूण तलाव परिसर

गणेश विसर्जनानंतर ‘अनुभूती’च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला मेहरूण तलाव परिसर

जळगाव,  (प्रतिनिधी)  गणेश विसर्जनानंतर जळगावातील मेहरूण तलाव परिसरात साचलेले निर्माल्य, प्लास्टिक व इतर कचरा संकलित करून परिसर स्वच्छ करण्याचा उपक्रम अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राबविला. ‘निर्माल्य तलावात नको, योग्य ठिकाणी जमा करूया’ आणि ‘प्लास्टिकमुक्त परिसर घडवू या’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश दिला. ‘गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धे’ अंतर्गत हा उपक्रम घेण्यात आला.

गणेशोत्सवादरम्यान मेहरूण तलावावरील गणेश घाटावर मोठ्या संख्येने मंडळे व भाविक विसर्जनासाठी येतात. विसर्जनानंतर निर्माल्य व प्लास्टिक कचरा परिसरात राहिल्याने अस्वच्छता आणि जलप्रदूषणाचा धोका निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी घाटाची पाहणी करून विखुरलेले निर्माल्य व कचरा संकलित केला.या उपक्रमास जळगाव महानगरपालिकेच्या उपायुक्त निर्मला गायकवाड, अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या रश्मी लाहोटी आणि स्पर्धेचे राज्य समन्वयक राजेंद्र बावस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी राजेंद्र बावस्कर यांनी आगामी काळात शाळेतर्फे राबविण्यात येणाऱ्या प्लास्टिकमुक्ती, जल व वृक्षसंवर्धन तसेच जनजागृतीपर उपक्रमांची माहिती उपायुक्त निर्मला गायकवाड यांना दिली. विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत गायकवाड यांनी महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सुकीर्ती भालेराव आणि निलीमा ढाके यांनी विशेष परिश्रम घेतले.

**सोबत फोटो-* मेहरूण तलाव परिसरात साचलेले निर्माल्य संकलित करणाऱ्या विद्यार्थ्सांसोबत अनुभूती शाळेच्या प्राचार्या रश्मी लाहोटी आणि शिक्षक.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button