
जळगाव शहर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना २० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी अटक
जळगाव (प्रतिनिधी): कौटुंबिक छळाच्या प्रकरणात २० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून जळगाव शहर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने गुरुवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, शहरातील एका महिलेने कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणातील चौकशीत सहकार्य करण्याच्या बदल्यात संशयित आरोपीकडून ५० हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती.
तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत ACB कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुरुवारी रात्री सापळा रचण्यात आला. पोलीस कर्मचारी रविंद्र सोनार यांनी पोलीस कर्मचारी धनराज निकुंभ यांच्या सांगण्यावरून २० हजार रुपयांची लाच मागितली, आणि ती स्वीकारताना ACB च्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास ACB विभागाकडून सुरू आहे.