खान्देशगुन्हेजळगांव

माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझ्या तोंडावर ऍसिड फेकेल ! अल्पवयीन मुलीला तरुणाची धमकी

पहूर ;- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला तू माझ्याशी निकाह करशील का ? तू मला बाजारात भेटत जा जर तू माल नाही भेटली तर मी तुझ्या तोंडावर ऍसिड टाकेल तू माझी नाही झालीस तर मी तुला दुसऱ्याची होऊ देणार नाही अशी धमकी दिल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी एकाविरुद्ध पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी कि , एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा आरोपी हा तिला शिवीगाळ करून तिचा वेळोवेळी पाठलाग करून माझ्यापाशी निकाह कर असे म्हणून मला बाजारात भेट जा अन्यथा तुझ्या तोंडावर ऍसिड टाकेल. तू माझी न झाल्यास कोणाचीही होऊ देणार नाही अशी धमकी आरोपीने २८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता, १० ऑक्टोबर रोजी सकाळी १० : ३० वाजता रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी दिल्याचा प्रकार घडल्याने पीडित मुलीने हा प्रकार घरच्यांना सांगून पहूर पोलीस स्टेशनला १२ रोजी रात्री ११ वाजता आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. . तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button