इतर

दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकावर धारदार शस्त्राने वार

जळगाव ;- शिवाजीनगर हुडको येथे एकाने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने धारदार शस्त्राने एकावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार १३ रोजी संकाळी ८ वाजेच्या सुमारास घडला . याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी की, शिवाजी नगर येथे काळे नगर भागात राहणारे महेंद्र नामदेव बडगुजर यांना आरोपी गुफरान (पूर्ण नाव माहीत नाही ) व तन्वीर उर्फ तन्या (पूर्ण नाव माहीत नाही ) , आणि लड्डा (पूर्ण नाव माहीत नाही ) या तिघांनी महेंद्र बडगुजर याला १३ रोजी रात्री ८ वाजता शिवाजी नगर हुडको येथील चहा टपरीसमोर यांनी धारदार सुराने डोक्यावर ,हाताच्या डाव्या अंगठ्यावर वार करून गंभीर दुखापत केली. तसेच त्यांच्या मित्रावरही वार करून जखमी केले. . यावेळी तिन्ही आरोपींची ५ हजार ६०० रुपये बळजबरीने हिसकावून पळ काढला . याप्रकरणी महेंद्र बडगुजर यांनी दलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button